मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तीन तासांचा कोकण दौरा केला. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंचा हा दौरा ठरला होता. पण हा दौरा चुकीच्या कारणांनीच जास्त चर्चेत राहिला. मुख्यमंत्र्यांनी एक औपचारिकता म्हणून हा दौरा केला असून त्यांना विषयाचे गांभीर्य नसल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्दयावरून निलेश राणे यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, २१ मे रोजी कोकण दौरा केला. पण मुख्यमंत्र्यांच्या या कोकण दौऱ्यावर चहू बाजूंनी जोरदार टीकेची झोड उठली आहे. तौक्ते वादळाचा फटका बसून नुकसान झालेल्या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भेटी दिल्या. त्या भेटीतही त्यांनी ना झालेल्या नुकसानाची पाहणी केली, ना वादळग्रस्त नागरिकांची भेट घेतली.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांच्या विरोधात याचिका
काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा
धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट
हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं
यावरूनच आपल्या आक्रमक शैली साठी प्रसिद्ध असणारे माजी खासदार आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. ते आले अन् न पाहताच निघून गेले असे राणे यांनी म्हटले आहे. ‘जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात थांबले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो’ असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कोकणी माणसाने समजून जावे शिवसेना आपल्याला भावनिक करून संपवायला निघाली आहे अशी जहाल टीका निलेश राणे यांनी केली आहे.
ते आले… अन् न पाहताच निघून गेले,
मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द.
जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021