25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणसुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध

सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध

भाजपा नेते निलेश राणेंची खोचक टीका

Google News Follow

Related

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या नेतृत्वातील दोन गट पडले आहेत. बुधवार, ५ जुलै रोजी दोन्ही गटांनी बैठकींचे आयोजन केले होते. यावेळी दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांनी भाषण करून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. या भाषणात संघर्षाच्या काळात आपण वडिलांसोबत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकत अजित पवारांवर टीका केली. त्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला शिक्षक वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, तसं भाषण होतं.  उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही. जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

‘परसातील साप फुत्कारू लागले आहेत’

पक्ष आणि चिन्ह आमचेच!

क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?

शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची बाजू मांडत वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य केले. त्यांनी शरद पवारांच्या सोबत आपण खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. तसंच अजित पवार यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. “मी महिला आहे. थोडं काही बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं . पण जेव्हा संघर्षांची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. ही लढाई एका व्यक्ती विरोधात नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात आपला लढा आहे. ही लढाई विचारांची आणि तत्वांची आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा