शिवसेनेने नारायण राणे यांच्या विरोधात केलेल्या बॅनरबाजीमुळे आणि नाशिक पोलिसांनी अटक करण्याचे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती चांगलीच तापलेली दिसत आहे. यावरूनच आता नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे आक्रमक झाले आहेत. ‘खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा’ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे.
नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा हा संघर्ष बघायला मिळत आहेत. राज्यात सध्या नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. राणे यांच्या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील ठाकरे सरकार विरोधात जनता आक्रोश व्यक्त करताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शिवसेना चांगलीच चिंतेत गेलेली दिसत आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र
शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश
खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी
पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!
शिवसेनेने मुंबईत नारायण राणे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. तर नाशिकमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी राणेंच्या विरोधात अटकेचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. पण यावरूनच आता राणे यांच्या कडून मात्र आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर प्रहार केला आहे.
‘कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.’ असा आक्रमक पवित्रा निलेश राणे यांनी घेतला आहे.