गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळाले असून आज काही कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवास्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली. दरम्यान या परिसरात कर्मचारी आक्रमक झाले असून न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “काय उपयोग ५० वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्यभर घाणेरड राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ,” असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. “पवार साहेब आता तरी संन्यास घ्या आणि गप घरी बसा,” असा खोचक सल्ला त्यांनी शरद पवारांना दिला आहे.
काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून?? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ.
पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा. https://t.co/gGMNBmzzbU
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 8, 2022
हे ही वाचा:
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक
आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा
इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार
दरम्यान, मुंबई न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एसटीच्या विलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. न्यायालयाचा निर्णय अन्यायकारी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार हे विलीनीकरण न होण्यामागचे सूत्रधार असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी काही महिला कर्मचाऱ्यांनी आक्रोश करत आपली व्यथा सांगितली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना घेरले.