30 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणशिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची 'कोरिओग्राफी'

शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’

Google News Follow

Related

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोरगरीब जनतेसाठी आमदार आपले कौशल्य पणाला लावत आहेत, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

व्हिडिओमध्ये भांडूप शिवसेना आमदार रमेश कोरगावकर हे गाण्यांवर ठेका धरून नाचताना दिसत आहेत. यावरून निलेश राणे यांनी रमेश कोरगावकर यांच्यावर टीका केली आहे. भांडूप शिवसेना आमदार रमेश कोरगावकर मतदारसंघातील गोरगरिबांसाठी स्वतःचे कौशल्य पणाला लावताना दिसत आहेत, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मतदार संघाच्या हिताची कामे हात- पाय वाकडेतिकडे करून कामामध्ये वाहून जाताना साहेब आपल्याला दिसत आहेत. गाणे ऐकून लक्षात येईल, असे आमदार सभागृहात काय करत असतील, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या

औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड

वकील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

चार वर्षे झाली तरी हुतात्मा ‘चौका’चे हुतात्मा ‘स्मारक’ का झाले नाही?

सध्या अजून एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे ती म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या संगीत सोहळ्यामध्ये संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या नृत्याची. संजय राऊत यांनी त्यांच्या मुलीच्या संगीत सोहळ्यात सुप्रिया सुळे यांच्यासोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावरून टीकाही होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा