‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, निलेश राणे!

राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया

‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, निलेश राणे!

राजकारणातून निवृत्तीची घोषणा करून अवघ्या २४ तासात आपल्या निर्णय मागे घेणारे निलेश राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला.’मी टायगर नाही, मी राणे आहे’, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.’माझं जे काही मत होतं ते मी देवेंद्र फडणवीसांसमोर मांडलं आहे आणि माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे’, असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे.निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.जागो-जागी टायगर इज बॅक अशा प्रकारचे फ्लेक्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत.

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. राजकरणात मन रमत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती.मात्र, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.भेटी नंतर मंत्री चव्हाण म्हणाले की, छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात असं त्याचं म्हणणं होतं.

हे ही वाचा:

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

याबाबत आम्ही चर्चा केली. निलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ, असे मंत्री चव्हाण म्हणाले होते.तसेच आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणेंनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.दोन दिवसानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

निलेश राणे म्हणाले की, मला जे काही बोलायचं होतं ते मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो आहे. मला विश्वास आहे की चर्चेत ते झालं ते नक्कीच होईल. म्हणून मी तयारीला देखील लागलोय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला जे वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितलं आणि माझ्या नेत्यांवर माझा विश्वास आहे, असं निलेश राणे म्हणाले.तसेच येणाऱ्या काळामध्ये कुडाळ – मालवण आणि कोकणातील सर्व जागा नेत्यांच्या सांगण्यावरुन निवडून आणायच्या आहेत. त्याच अनुषंगाने मी काम सुरु केलय. त्यामुळे भाजपचा नक्की विजय होईल, असा विश्वास यावेळी निलेश राणे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version