भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे तोंडावर गोड असतात पण ते आतून महाकपटी आहेत असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भाजपा नेते निलेश राणे हे आल्या दिवशी महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. ट्विटरवर सक्रिय असणारे राणे हे रोज ठाकरे सरकारची पिसं काढत असतात. बुधवार, १२ मे रोजी राणेंनी अशाच प्रकारे ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चपराक लगावली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने परिचारिका ‘दीन’
मराठा आरक्षणाच्या नावावर सरकार एप्रिल फुल बनवत आहे- आशिष शेलार
दोन दिवसांच्या वेतन कपातीवर पोलीस दलाची नाराजी
राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी सामनाच्या अग्रलेखाचा फोटो ट्विट केला आहे. सामनाच्या या अग्रलेखात काँग्रेस नेते राहुल गांधी अध्यक्षपद सोडल्यापासून रिकामेच आहेत असा उल्लेख करण्यात आला आहेत. याचाच आधार घेत राणे यांनी एकाच ट्विटमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर दुहेरी निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी विरोधी पक्षातल्या लोकांनीही कधी इतके शेलके शब्द वापरले नाहीत पण काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने ते केले. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा स्वभावच असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणाचेच नाहीत. तोंडावर गोड बोलतात, पण आतून ते महाकपटी आहेत असा घणाघात राणे यांनी केला आहे. तर काँग्रेसचा सत्तेत राहून फायदा काय? त्यांना इज्जत कुठाय? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे.
इतक्या शेलक्या शब्दात काँग्रेसच्या विरोधकांनी सुद्धा राहुल गांधी बद्दल असे शब्द काढले नसतील जे सत्तेमध्ये सोबत राहून शिवसेनेने वापरले. संजय राऊत व उद्धव ठाकरे कोणाचेच नाही. तोंडावर गोड पण आतून महा कपटी त्यांचा मूळ स्वभाव आहे. काँग्रेसचा सत्तेत राहून काय फायदा, इज्जत कुठे आहे?? pic.twitter.com/frAvBGlVZg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 12, 2021