कुख्यात गुंड दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक कोठडीत आहेत. मात्र, मलिक न्यायालयीन कोठडीत असतना ते मंत्री असलेल्या अल्पसंख्याक विभागाचे निर्णय घेत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून मलिकांवर हल्लाबोल केला आहे.
गुरुवार,२८ एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक विभागातही निर्णय़ घेण्यात आले आहेत. याची माहिती ठाकरे सरकारने ट्विटरवरून दिली आहे. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागाचा निर्णय सादर केला असून त्यात नवाब मलिकांचा देखील फोटो आहे. या निर्णयाच्या फोटोवरुन निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. pic.twitter.com/1G6M9c2AQK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 29, 2022
नवाब मलिकांनी तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर राणे म्हणाले, काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की रडावं हेच कळत नाही. दाऊदसोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहेत आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांचा निर्णय जाहीर केला आहे.
हे ही वाचा:
कीर्तनकार प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांचा माफीनामा
मुंबईकरांची एसी लाईफलाईन झाली स्वस्त
ठाकरे सरकार विरोधात किरीट सोमय्या न्यायालयात
संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक
गुरूवारी मलिकांनी एक मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.