एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांच्या मदतीने राज्यात नवीन सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. सत्तांतरानंतर माजी उपमुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली अशी बोचरी टीका केली आहे. माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अटकेबद्दल ते म्हणाले की, जे उद्धव ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते देशोधडीला लागले.
आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत टीका करताना निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत २० आमदार नाहीत पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची उद्धव ठाकरेंना नेता मानायची इच्छा नाही ते त्याच पक्षात राहून नेता का बदलू शकत नाहीत? बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं या उद्धव ठाकरेंनी. सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली, असं ट्विट करत निलेश राणेंनी यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र
मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडेंसारखे जे उद्धव ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते सगळे देशोधडीला लागले, असे ट्वीट निलेश राणेंनी केले. तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, असेही निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. या मुद्द्यावरूनही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.