“राजीनामा दिला म्हणजे काही उपकार नाही, आता गुन्हा दाखल करा”- निलेश राणे

“राजीनामा दिला म्हणजे काही उपकार नाही, आता गुन्हा दाखल करा”- निलेश राणे

राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड याने मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आल्याने त्याने पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर हल्ला चढवला.

हे ही वाचा:

अखेर संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल करावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असेही निलेश राणे म्हणाले.

हे ही वाचा:

“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

दरम्यान, “धनंजय मुंडे हे टोकाचे निर्लज्ज असल्यामुळे बलात्काराचे आरोप होऊनही त्यांनी राजीनामा दिला नाही. महाविकास आघाडीतील नेते नुसते राजीनामा देऊन सुटता कामा नयेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या नेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे.” असेही निलेश राणे यांनी सांगितले.

याशिवाय, “पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचे नाव घेण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं.” असेही निलेश राणे म्हणाले.

Exit mobile version