सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी गिळले महाराष्ट्राचे पैसे

सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी गिळले महाराष्ट्राचे पैसे

सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला. शरद पवार यांनी साखर कारखान्याच्या मालकांना लिहिलेल्या पत्रावरून आक्रमक पवित्रा घेत त्यांनी पवारांवर निशाणा साधला. त्याचवेळी राणे यांनी हा आरोप केला आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरु असून देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात सध्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे लसीची कमतरता आहे. तर कुठे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातही सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार सर्व साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १९० साखर कारखान्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीत योगदान द्यावे असे त्यांना सूचित करण्यात आले आहे. शरद पवार हे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची ही प्रमुख संस्था आहे. याच अधिकारात पवार यांनी हे पत्र लिहिले आहे.

हे ही वाचा:

सुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

पवारांच्या याच पत्रलेखनावरून निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांना लक्ष्य केले आहे. साहेब आपण काही करू नका. डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील इंडस्ट्रीज यातून मार्ग काढतील असे म्हणताना तुम्ही जर घुसलात तर सामान्य माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण ठेवणार नाही असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. याच वेळी राणे यांनी असा आरोप केला आहे की कोविडच्या पहिल्या लाटेत सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले आहेत.

Exit mobile version