निलेश राणेंचा राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निर्णयाची घोषणा

निलेश राणेंचा राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या या निर्णयाची घोषणा केली. राजकरणात मन रमत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, निवृत्तीचे कारण निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

सक्रिय राजकारणातून आपण कायमचे बाजूला होत असल्याचे नितेश राणे म्हणाले. राजकरणात मन रमत नसून या निर्णयामागे इतर काही कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या १९ ते २० वर्षांमध्ये त्यांना सर्वांकडून प्रेम मिळाले तसेच लोक नेहमी सोबत उभे राहिले यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. भारतीय जनता पक्षात खूप प्रेम मिळाल्याचे आणि या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्याचे नशीब असल्याचे निलेश राणे म्हणाले.

हे ही वाचा:

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!

“मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version