भाजपाचा प्रचार केला म्हणून, निदा खानला जीवे मारण्याची धमकी

भाजपाचा प्रचार केला म्हणून, निदा खानला जीवे मारण्याची धमकी

तिहेरी तलाकविरोधात लढणारी निदा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निदाने भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडावे म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निदाला तिच्याच सासरच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. निदा खानने भाजपापासून दूर राहावे, म्हणून त्यांच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी धमकी दिली आहे. यांसंदर्भात निदाने बारादरी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवली आहे.

बारादारीच्या शाहदाना भागात राहणाऱ्या निदा खानने निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राज्यभर भाजपाचा प्रचार केला आणि लोकांना भाजपाच्या योजनांची माहिती दिली. मोदी सरकारने तिहेरी तलाक कायदा लागू करून मुस्लिम भगिनींना मोठे सुरक्षा कवच दिले आहे, या बद्दल निदाने सगळीकडे भाजपाचा प्रचार केला होता. त्यामुळे निदाला तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पतीने आणि कुटुंबातील अनेकांनी तिला धमकी दिल्यांनतर निदाने बारादरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  निदाला यापूर्वी अनेकदा धमक्या आल्या आहेत, त्यामुळे तिला पोलिस संरक्षणही मिळाले आहे. निदा ही जगप्रसिद्ध आला हजरत कुटुंबातील सून आहे. तीन तलाक दिल्यानंतर तिच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात आता मास्क ऐच्छिक!

नाणार जाणार, पण बारसूवासीयांच्या हाती काय येणार ???

महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!

त्यानंतर निदाने तिहेरी तलाकविरोधात मोहीम सुरू केली आणि आला हजरत हेल्पिंग सोसायटी नावाने एनजीओ स्थापन केली. त्यानंतर निदा नेहमीच चर्चेत राहिली. काही वर्षांपूर्वी निदा खानविरोधात फतवा काढण्यात आला होता, ज्यामध्ये तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले होते.

Exit mobile version