परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल

आज परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. सचिन वाझे प्रकरणात अनेकांची चौकशी होत असताना त्यात माजी पोलीस आयुक्तांचाही समावेश होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल

Photo credit ANI

अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या गाडीच्या प्रकरणात चौकशी करणाऱ्या एनआयएच्या कार्यालयात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

एनआयएकडून सचिन वाझेची अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात कसून चौकशी चालू आहे. सचिन वाझेला कोरोना काळात पुन्हा नियुक्त करण्यात आले, त्यापुर्वी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. या संदर्भात मुंबई पोलीसांचा एक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या अहवालानुसार पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांचा विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी सचिन वाझेची नियुक्ती केली होती. असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच परमबीर सिंह यांच्यामुळेच हाय प्रोफाईल केसेस वाझेकडे आल्या असे देखील सांगण्यात आले. मंत्र्यांच्या ब्रीफींगवेळीही वाझे उपस्थित असायचा असा ठपकही या अहवालातून ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच सचिन वाझे साधे एपीआय असूनही उच्च पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली आणि इतकेच नव्हे तर सचिन वाझे थेट आयुक्तांना रिपोर्ट करत होते असा ठपका देखील परमबीर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सरकारी गाडी असताना देखील सचिन वाझे मर्सिडीज, ऑडी यांसारख्या महागड्या गाड्या वापरून कार्यालयात येत असत असेही या अहवालातून उघड झाले आहे.

हे ही वाचा:

तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा

कोरोनाचे तांडव सुरूच

या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यासाठी एनआयए कार्यालयात आज सकाळीच परमबीर सिंह दाखल झाले आहेत. त्यांचा या प्रकरणात काय हात आहे, हे देखील चौकशी अंती उघड होईल. या चौकशीत दोषी आढळल्यास परमबीर सिंह यांच्यावर देखील कारवाई करा असे मत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच वाझेला नियुक्त करण्यासाठी परमबीर सिंहांवर दबाव कोणी टाकला? किंवा त्यावेळेला मुख्यमंत्री, गृहमंत्री काय करत होते असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version