जम्मू-काश्मीरचा फुटिरतावादी यासिन मलिक याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. यासिनवर भारतीय जवानांवर गोळीबार, गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण करण्याबरोबरच टेरर फंडिंगचेही त्याच्यावर आरोप आहेत.
गेल्यावर्षी ट्रायल कोर्टाने यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी एनआयएने ट्रायल कोर्टासमोर केली होती, पण ती फेटाळण्यात आली. आता एनआयएने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.
हे ही वाचा:
ओम साईश्वर सेवा मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र अजिंक्य
पावसाची स्थिती यंदा सामान्य, ९६ टक्केचा अंदाज !
दीड हजार कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
राऊत यांची विधाने म्हणजे विरोधकांनी मोदींपुढे हात टेकल्याचा पुरावा!
हायकोर्टाचे न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर सोमवारी २९ मे रोजी एनआयएच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यासिन मलिकला दिल्लीच्या स्थानिक कोर्टाने मे २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणात बेकायदेशीर प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरविण्यात आले होते.
यासीननं आरोपांविरोधात खटला न लढवण्याचा निर्णय घेतला, त्याऐवजी त्यानं गुन्हा कबूल केला होता. यासिन मलिक हा जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी आणि पूर्वीचा दहशतवादी आहे. काश्मीरला भारत आणि पाकिस्तान दोन्हीपासून वेगळे करण्याची मागणी त्याने सातत्याने लावून धरली आहे. बंदी असलेल्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) या काश्मीरस्थित संघटनेचा तो अध्यक्ष आहे. या संघटनेमार्फत टेरर फंडिंगसाठी पैसा पुरवल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.