सचिन वाझे याचे कारनामे महाविकास आघाडी सरकारच्या अंगाशी येत आहेत. दर दिवशी वाझेच्या विषयावरून विरोधक आघाडी सरकारला धारेवर धरतच असतात. पण वाझेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये आपसात पण जुंपलेली दिसत आहे. अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निरुपम यांनी थेट संजय राऊत यांचीच चौकशी करायची मागणी केली आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार असलेले संजय निरुपम हे कायमच आपल्या आक्रमक विधानांमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते आपल्या मित्रपक्षांनाच घरचा आहेर देत असतात. मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या अशाच एका विधानाने चर्चेत आले आहेत. कारण निरुपम यांनी थेट आपल्या मित्रपक्षाच्या नेत्याच्याच चौकशीचीच मागणी केली आहे. संजय राऊत यांनी असे म्हटले होते की “वाझेला जर पुन्हा पोलीस सेवेत घेतले तर वाझेमुळे सरकार अडचणीत येईल असा इशारा आपण महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना दिला होता.” राऊतांच्या याच विधानावरून संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी
काय म्हणाले निरुपम?
“संजय राऊतांनी असे म्हटले आहे की त्यांचा वाझेला पुन्हा सेवेत घेण्याला विरोध होता. पण कालपर्यंत तेच वाझेला प्रामाणिक आणि सक्षम म्हणत होते. तरीही हे सांगावेच लागेल की कोणत्या नेत्याच्या खांद्यावर चढून वाझे पोलीस दलात आला. राष्ट्र्रीय सुरक्षा यंत्रणेने राऊतांसारख्या बडबड करणाऱ्या नेत्यांना उचलून त्यांच्यामार्फत वाझेच्या मालकांपर्यंत पोहोचावे.” असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.
संजय राऊत ने कहा है कि वे #सचिन_वज़े की पुलिस में दुबारा बहाली के खिलाफ थे।हालाँकि वे कल तक वज़े को ईमानदार और सक्षम बता रहे हैं।
फिर भी वे कौन-से नेता थे जिनके कंधे पर चढ़कर वज़े आया,यह बताना पड़ेगा।#NIA को राऊत जैसे बकबक करनेवालों को उठाकर वज़े के आकाओं तक पहुँचना चाहिए।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 30, 2021