मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी याच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापा टाकला आहे. सोमवार, ९ मे रोजी सकाळी NIA ने कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, डी कंपनीसंबंधी NIA ने २० ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
सुहेल खांडवानी हा माहीम येथे राहत असून तो हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. सुहेल याच्या घरात छापेमारी सुरू असून त्याच्या घराच्या परिसरात मोठा सीआरपीएफ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १९९३ मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान NIA ने सलीम फ्रुट नावाच्या व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सोमवारी सकाळीच NIA ने मुंबईत कारवाईला सुरुवात केली आहे. NIA कडून मुंबईत २० ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मुंबईतील बोरिवली, मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, सांताक्रूझ, भेंडी बाजार या ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
NIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक
कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता.