उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. रविवार २८ मार्च रोजी आपल्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्वाचे मानले जाणारे पुरावे एनआयएने शोधून काढले आहेत.
राज्यात गेले अनेक दिवस अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला अटक केली असून तो अंबानी स्फोटक प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर मनसुख हत्येतही वांझेची भूमिका असल्याचा जबाब वाझे याचा जुना सहकारी असलेल्या आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक झालेल्या विनायक शिंदे ह्याने दिला आहे.
हे ही वाचा:
कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक
उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब
एटीएस आणि एनआयए हे मनसुख प्रकरणाचा तपास करत असताना सचिन वाझेने या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली होती. यातले काही पुरावे मुंबई येथील बीकेसी परिसरात मिठी नदीत फेकल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. रविवारी एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन मिठी नदी परिसरात पोहोचले. यावेळी सचिन वाझेच्या उपस्थिती उतरून तपास करण्यात आला. एनआयएच्या या प्रयत्नाला यश आले आहे.
Maharashtra: NIA takes Sachin Waze to the bridge over Mithi river in Mumbai's Bandra Kurla Complex in connection with the probe of Mansukh Hiren death case.
Divers have recovered a computer CPU, number plate of a vehicle, and other items from the river. pic.twitter.com/nIxN60tOU7
— ANI (@ANI) March 28, 2021
एनआयएच्या या तपासात गाडीच्या दोन नंबरप्लेट्स सापडल्या आहेत. या दोन्ही नंबरप्लेट्सचा नोंदणी क्रमांक एकच आहे. या सोबतच कॉम्पुटरचा सीपीयू, डीव्हीआर आणि इतर काही गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टी हाती लागल्यामुळे आता मनसुख हिरेन हत्या केस सोडवण्याच्या दृष्टीने मदत होण्याची शक्यता आहे. यातून मनसुख प्रकरणात नवीन खुलासे होऊ शकतात.
#WATCH | Maharashtra: Divers of NIA recover computer CPUs, two number plates carrying the same registration number, and other items from Mithi river in Mumbai's Bandra Kurla Complex as the agency probes the death of Mansukh Hiren.
Accused Sachin Waze is also present at the spot pic.twitter.com/RXq2d4cCMP
— ANI (@ANI) March 28, 2021