राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी २०१८ च्या एल्गार परिषद-माओवादी प्रकरणासंदर्भात १५ आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष न्यायालय २३ ऑगस्ट रोजी आरोपपत्राच्या मसुद्यावर विचार करेल आणि नंतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करेल. आरोपपत्र आता दाखल झालेले आहे. या संबंधित खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वी, आरोप निश्चित केल्यानंतर, न्यायालय आरोपींना विचारेल की त्यांनी या प्रकरणात त्यांचा गुन्हा कबूल केला आहे की नाही.
सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या आरोपांमध्ये १७ जणांविरूद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तसेच त्यांना बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली दोषारोप ठेवले आहेत. आरोपींच्या वकिलांनी सोमवारी आरोपींवर आरोप निश्चित करण्यापूर्वी दाखल केलेल्या अर्जांची सुनावणी आणि निकाली काढण्याची विनंती न्यायालयाला केली.
त्यानंतर, एनआयएचे विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी एनआयएला सर्व अर्जांवर प्रति-प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. त्याचबरोबर आरोपींवरील युक्तिवाद पुढील तारखेला ऐकले जातील. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस, वरवरा राव, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा आणि इतरांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?
चंदिगढ विद्यापीठाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल………वाचा सविस्तर!!
तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर
अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ
एल्गार परिषद प्रकरण ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ दुसऱ्या दिवशी हिंसाचार झाला. माओवाद्यांशी कथित संबंध असलेल्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.