आज देशातील बहुतांश मतदार पंतप्रधान मोदींच्या नावावरच भाजपला मतदान करायला तयार आहेत.मग उमेदवार कोणीही असो?. आज (१४ मार्च) न्यूज १८ नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला.मेगा ओपिनियन पोलनुसार, ८५ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपला मतदान करणार असल्याचे सांगितले आहे, मग उमेदवार कोणताही असो.जेव्हा लोकांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे यांच्यामुळे मत द्याल का?, मग तुमच्या विभागात कोणीही उमेदवार उभा असो, यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, होय-८५ टक्के , नाही- ११ टक्के, सांगू नाही शकत- ४ टक्के.
याशिवाय जगभरातील नेत्यांच्या रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत अव्वल स्थानावर आहेत. याचे कारण देशातील लोक मोठ्या संख्येने त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. याबाबत न्यूज १८ च्या मेगा ओपिनियन पोलमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी आहात? तर त्याचे उत्तर असे आले, खूप समाधानी – ८० टक्के , ना समाधानी ना असमाधानी – १० टक्के , असमाधानी – ५ टक्के , खूप असमाधानी – ४ टक्के, सांगू शकत नाही – १ टक्के.
हे ही वाचा:
‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’
पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!
अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
पोलनुसार पाहिले तर देशातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळी पुन्हा सत्तेत पाहायचा आहे. न्यूज१८ नेटवर्कचे मेगा ओपिनियन पोल २१ प्रमुख राज्यांमधील ५१८ लोकसभा मतदारसंघांच्या सर्वेक्षणाद्वारे घेण्यात आले आहे.सर्वेक्षणानुसार, बिहारमधील आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आघाडीला ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन जागा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीच्या वाट्याला जाऊ शकतात.दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाही केली. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनुराग सिंह ठाकूर, प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांच्यासह काही मोठ्या नावांचा समावेश आहे