News Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात

News Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात

शिवडी वरळी उन्नत मार्गिका प्रकल्पामुळे एलफिस्टन, प्रभादेवी या भागातील शेकडो कुटुंबातील हजारो रहिवाशी बाधित होत असून या प्रकरणाला ‘न्यूज डंका’ने वाचा फोडली होती. ‘न्यूज डंका’ने केलेल्या बातमीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवार २७ फेब्रुवारी रोजी या परिसराला भेट देऊन रहिवाशांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

या प्रकरणासंबंधी शिवसेनच्या आमदारांनी, लोक प्रतिनिधींनी अनेक बैठका घेतल्या आहेत. परंतु, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. स्थानिक रहिवाशी धनंजय वायंगणकर आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी चर्चा करून या विषयाचे गांभीर्य समजून घेतलं आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. येथील रहिवाश्यांना पुनर्वसनानंतर फार लांब जायचे नाही. कारण त्यांच्या मुलांच्या शाळा- कॉलेज तसेच त्यांचे व्यापार-व्यवसाय, याच ठिकाणी गेली वर्षोनुवर्षे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना आजूबाजूला पर्यायी प्लॉट बघून त्यांचे पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

एका बाजूला मराठी माणसांविषयी बोलायचे आणि दुसरीकडे शिवडी, परळ, लालबागचा मराठी माणूस हद्दपार होत आहे. हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. यासाठी आंदोलन करावं लागलं तर भाजपा या नागरिकांच्या सोबत आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले. एमआमआरडीएचे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करू, असेही प्रवीण दरेकर यांनी रहिवाशांना सांगितलं.

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घातल्यामुळे रहिवाशी धनंजय वायंगणकर यांनी सर्व रहिवाशांतर्फे ‘न्यूज डंका’ चे विशेष आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

अजित पवारांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक! म्हणाले…

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी

युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री

वरळीवरून थेट शिवडी न्हावा शेवाला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारते आहे. वांद्रे, वरळी सागरी सेतूवरून थेट शिवडी न्हावा शेवा मार्गावर जाता यावे म्हणून वरळी, प्रभादेवी, परळ, भोईवाडा या परिसरातून नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. मात्र हा मार्ग गिरणगावाच्या भरवस्तीतून जात आहे. या मार्गात येणाऱ्या इमारती आणि चाळींमधील रहिवाशांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आमचे पुनर्वसन कधी होणार, कुठे होणार की आमच्या तोंडाला पाने पुसली जाणार? असे अनेक प्रश्न या रहिवाशांनी विचारले आहेत. याच परिसरात पुनर्वसन करावे अशी स्थानिकांची मागणी आहे.

या प्रकरणाला वाचा फोडणारा ‘न्यूज डंका’चा हा स्पेशल रिपोर्ताज- 

Exit mobile version