केरळमधील सत्ताधारी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे (यूडीएफ) केरळच्या कोल्लमचे खासदार एनके प्रेमचंद्रन यांनी अन्य खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेल्या आठवड्यात संसदेच्या कँटीनमध्ये भोजन घेतल्याने केरळमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
सत्ताधारी माकपने रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे (आरएसपी) खासदार पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकट जात असल्याचा आरोप केला आहे. आरएसपी हा काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीचा घटक पक्ष आहे. लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ)चे समन्वयक ईपी जयराजन यांनी ‘आरएसपीच्या प्रेमचंद्रन हे यूडीएफचे घटकपक्ष आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजन करण्याची काय गरज होती अन् याचा अर्थ काय?,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी ज्या आठ जणांना भोजनासाठी निमंत्रण दिले, त्यापैकी एक प्रेमचंद्रन होते. याचा अर्थ काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांना आमंत्रण दिले नाही.
लोकसभेची दिशा ठरवणे इतके महत्त्वाचे असेल तर, यूडीएफच्या कोणाला आमंत्रण द्यायचे असेल तर पहिली व्यक्ती म्हणजे शशी थरूर असणे गरजेचे होते. हा प्रकार म्हणजे भाजप आणि आरएसएशी नवे नाते जोडण्याचा प्रकार आहे,” अशी टीका जयराजन यांनी केली आहे.माकपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी प्रेमचंद्रन यांची खिल्ली उडवली. ते पंतप्रधानांच्या निकट असल्याने ते गेले असावेत, असे ते म्हणाले. तर, प्रेमचंद्रन यांनी पंतप्रधान कार्यालयाचे निमंत्रण स्वीकारल्याच्या निर्णयाचे समर्थन करून ही राजकारणापलीकडची मैत्रीपूर्ण बैठक होती, असे स्पष्ट केले. ‘पंतप्रधान कार्यालयाकडून हे अनपेक्षित निमंत्रण होते.
हे ही वाचा:
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद
खारमध्ये जेवणात गुंगीचे औषध देऊन ५० लाखाची लूट
ती केवळ एक मैत्रीपूर्ण आणि प्रासंगिक चर्चा होती. त्यात कोणताही राजकीय मुद्दा चर्चेसाठी आला नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी केले. केरळमधील काँग्रेस नेतृत्वानेही पंतप्रधानांनी दिलेले निमंत्रण स्वीकारण्यात काहीच गैर नाही, असे स्पष्ट केले.
केरळमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी माकपकडे बोलण्यासारखे काहीही नसल्याने ते जाणूनबुजून वाद निर्माण करत असल्याचा आरोप केला.
‘मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा राजकीय विरोध असतानाही विरोधी पक्षनेते आणि यूडीएफच्या आमदारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे प्रेमचंद्रन यांनाही पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रण मिळाले,’ असे सतीसन म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भोजनाला बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, तेलुगू देसम पक्षाचे के राम मोहन नायडू, बसपचे रितेश पांडे आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन आणि हीना गावित यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यानंतर त्यांच्या सामूहिक भोजनाची छायाचित्रे पोस्ट करून ‘आल्हाददायक भोजनाचा आनंद लुटला. विविध पक्ष आणि भारताच्या विविध भागांतील संसदीय सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यांचे आभार,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.