न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

न्यूयॉर्क टाइम्सला भारतातून विशेषतः दिल्लीतून  एक वार्ताहर हवा आहे. पण तो उत्तम बातमी लिहिणारा, बातमीची चांगली जाण असणारा असला पाहिजे या नेहमीच्या अटी त्यासाठी नाहीत तर तो हवा आहे, मोदीविरोधी, हिंदूविरोधी. धक्का बसला ना. पण हे खरे आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या दक्षिण आशियाई बिझनेस वार्ताहर म्हणून त्यांनी वार्ताहरपदासाठी दिलेल्या जाहिरातीत या अटी घातल्या आहेत. एकूणच न्यूयॉर्क टाइम्सचा जो भारतातील मोदीविरोधी अजेंडा आहे, त्यावर या जाहिरातीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

या जाहिरातीत त्यांनी असे आवाहन केले आहे की, जो भारतातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध लिहू शकेल तसेच सत्तापालट करण्यासाठी योगदान देणारा हा वार्ताहर असला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात भारतात राहून जो भारताविरुद्ध गरळ ओकू शकेल, अशा पत्रकाराची गरज न्यूयॉर्क टाइम्सला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

बेल्जीयमला हरवत इटली उपांत्य फेरीत

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

यासोबत न्यूयॉर्क टाइम्सने जे नमूद केले आहे त्यावरून त्यांचा मोदीद्वेष, भारतद्वेषही स्पष्टपणे दिसतो. त्यात म्हटले आहे की, भारत हा लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहे. शिवाय, जागतिक पातळीवर आपला आवाज बुलंद करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. नरेंद्र मोदी या भारताच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत आशियातील चीनच्या आर्थिक आणि राजकीय ताकदीला आव्हान देत आहे. सीमेवरील तणावग्रस्त वातावरणात तसेच राजधानीत ‘नाट्य’ उभारले जात आहे. मोदी हे आत्मनिर्भरता आणि बळकट राष्ट्रवादाचा पुरस्कार हिंदू बहुसंख्याकांसाठी करत आहेत. शिवाय, आधुनिक भारताचे जे शिल्पकार आहेत त्यांच्या सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला छेद देत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त प्रसारमाध्यमे यावर अंकुश ठेवला जात आहे.

Exit mobile version