हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना नवी नियमावली

राज्यसभा कार्यालयाकडून यादी जाहीर

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना नवी नियमावली

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या खासदारांसाठी विशेष सूचनांसह नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. कोणतेही राज्यसभा खासदार ६० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे.

याशिवाय आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे.

राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा!

टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

काय आहे नवी नियमावली?

Exit mobile version