34 C
Mumbai
Friday, March 7, 2025
घरदेश दुनियानवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणातून आमूलाग्र बदलणाऱ्या अमेरिकेचा हुंकार, पूर्वीचे वैभव पुन्हा...

नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणातून आमूलाग्र बदलणाऱ्या अमेरिकेचा हुंकार, पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवणार

शिक्षण धोरण बदलणार, अनधिकृत स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता, वाहन उद्योगात क्रांती...

Google News Follow

Related

अमेरिकेचा सुवर्णकाळ आजपासून सुरू झाला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नव्या कारकीर्दीचे वर्णन केले. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे ४७वे राष्ट्रप्रमुख म्हणून ७८ वर्षीय ट्रम्प यांनी शपथ घेतली आणि आजच्या दिवसापासून अमेरिका प्रगतीच्या मार्गावर घोडदौड करेल आणि अमेरिकेचा आदरसन्मान अधिक वृद्धिंगत होईल, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या या भाषणात अमेरिकेच्या आगामी वाटचालीचा समग्र आलेख होता. अत्यंत कठोर असे काही निर्णय आपल्या सरकारच्या काळात घेतले जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आणि अखंड टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी ट्रम्प यांचे कौतुक केले.

आपण अमेरिकेला पहिल्या क्रमांकावर नेणार आहोत, असा आत्मविश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. अमेरिका यापूर्वी कधीही नव्हती अशी महान, अधिक बलवान आणि एकमेवाद्वितिय असेल अशी गर्जनाही ट्रम्प यांनी केली.

हे ही वाचा:

मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’

परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न

गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा

ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सांगितले की, अमेरिकन जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात आम्हाला जनतेने भरघोस बहुमत दिले आहे. जनतेला आम्ही तो विश्वास परत देऊ, संपत्ती, लोकशाही आणि स्वातंत्र्यही अमेरिकन जनतेला परत दिले जाईल. या क्षणापासून अमेरिकेची घसरण आम्ही संपुष्टात आणत आहोत.

ट्रम्प यांनी दोन बायबल्सद्वारे शपथग्रहण केली. एक बायबल त्यांना त्यांच्या आईने देऊ केले होते तर दुसरे हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी शपथग्रहण करताना वापरले होते.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले. एक्सवरून त्यांनी हे अभिनंदन केले. ते म्हणतात,  अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल परममित्र डोनाल्ड ट्रम्प आपले खूप अभिनंदन. दोन्ही देशांच्या भल्यासाठी आपण एकत्र काम करू. त्यातून जगाचे हित साध्य होईल हा प्रयत्न करू. पुन्हा एकदा या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

ट्रम्प यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 

  • दक्षिण अमेरिकेत आजपासून आणीबाणी जाहीर केली जात असून गैरमार्गाने अमेरिकेत केला जाणारा प्रवेश आता पूर्णपणे बंद होईल. अन्य देशातून आलेल्या गुन्हेगारी मानसिकतेच्या लाखो लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देण्यात येईल. त्यासाठी या सीमेवर अधिक सुरक्षा दल पाठविण्यात येईल.
  • आपली शिक्षणपद्धती जी मुलांना स्वतःबद्दलच न्यूनगंड निर्माण करते ती आजपासून आमूलाग्र बदलली जाईल आणि तीदेखील अगदी वेगाने.
  • २० जानेवारी २०२५ हा मुक्ती दिन आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुका या आपल्या देशातील सर्वोच्च निवडणुका म्हणून गणल्या जातील.
  • आपल्या मार्गात येणाऱ्या शत्रुंना योग्य उत्तर दिले जाईल. गल्फ ऑफ मेक्सिको यापुढे गल्फ ऑफ अमेरिका म्हणून ओळखले जाईल.
  • आमच्या नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी आम्ही इतर देशांवर कर लावू. आपल्या जनतेवर कर लावून इतर देशांना श्रीमंत करण्याची पद्धत बंद केली जाईल.
  • पनामा कालवा अमेरिका परत घेईल. चीनकडून पनामा कालव्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. आम्ही तो चीनला कधीही मिळू देणार नाही.
  • हमासने सोडलेल्या इस्रायलच्या तीन अपहृतांचा उल्लेखही ट्रम्प यांनी केला.
  • अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या दहशतवादी घोषित केले जाईल. अमेरिकेच्या धरतीवर या परकीय शक्तींचा बीमोड केला जाईल.
  • महागाई कमी करण्याचे पूर्ण प्रयत्न.
  • अमेरिका आपला विस्तार करेल, आपली संपत्ती वाढवेल तसेच अगदी मंगळावरही अमेरिकेची पताका फडकवेल.
  • अमेरिकेत तेल आणि भूगर्भवायूंचे प्रचंड साठे आहेत. आम्ही त्यांचा पूर्ण वापर करू. त्यासाठी खोदकाम वेगाने केले जाईल. ड्रील बेबी ड्रील…
  • आता अमेरिकेत केवळ पुरुष आणि स्त्री अशी दोनच लिंग असतील. केवळ असाच उल्लेख प्रत्येक कागदपत्रांवर असेल.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
233,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा