“नवा भारत कोणाला त्रास देत नाही, पण…” योगी आदित्यनाथ यांनी दिला इशारा

लखीमपूर खेरी येथे जनतेला संबोधित करताना व्यक्त केला संताप

“नवा भारत कोणाला त्रास देत नाही, पण…” योगी आदित्यनाथ यांनी दिला इशारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करत घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “नवा भारत कोणाला त्रास देत नाही पण कोणी त्रास दिला तर मात्र त्याला सोडत नाही.”

लखीमपूर खेरी येथे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, दहशतवाद आणि अराजकतेला समाजात स्थान नाही. पहलगाम हल्ल्यात प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. “आपल्या समाजात दहशतवाद किंवा अराजकतेला स्थान असू शकत नाही. भारत सरकारचे सुरक्षा, सेवा आणि सुशासनाचे मॉडेल विकासावर आधारित आहे. ते गरिबांच्या कल्याणावर आणि सर्वांच्या संरक्षणावर आधारित आहे. तथापि, जर कोणी सुरक्षेचे उल्लंघन करण्याचे धाडस केले तर नवा भारत त्याला समजणाऱ्या भाषेत योग्य उत्तर देण्यास तयार आहे. नवा भारत कोणाला त्रास देत नाही पण कोणी त्रास दिला तर मात्र त्याला सोडत नाही (ये नया भारत किसी को छेडता नहीं लेकीन अगर कोई छेडगा तो उसको छोडगा भी नहीं), असा इशारा मुख्यमंत्री योगी यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर खेरी येथील शारदा नदीच्या जलवाहिनीकरण कामाची पाहणी केली. त्यापूर्वी २४ एप्रिल रोजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूर येथील शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट घेतली, जो हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ निष्पाप बळींपैकी एक होता. निषेध व्यक्त करताना आदित्यनाथ यांनी या हल्ल्याला भ्याड कृत्य म्हटले आणि भारतात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत याचा पुनरुच्चार केला. “२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात कानपूरमधील शुभम यांचा मृत्यू झाला. शुभम द्विवेदी यांचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते आणि तेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी केलेला हा अतिशय भ्याड हल्ला आहे. दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे. भारतासारख्या देशात अशी घटना स्वीकारार्ह नाही,” असे योगी म्हणाले.

हे ही वाचा..

पाकिस्तान हवाई क्षेत्र बंदीमुळे डीजीसीएकडून विमान कंपन्यांना सूचना; मार्गदर्शक तत्त्वात काय म्हटले?

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्य संस्कार

तहव्वुर राणाचा धक्कादायक खुलासा

बुलंदशहरमधून चार पाकिस्तानी महिला परतल्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच हल्ल्याने प्रभावित झालेल्या भागांची पाहणी केली आहे आणि दहशतवादाच्या समस्येवर उपाय म्हणून पुढील पावले उचलली जातील, असे ते म्हणाले. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन कुरणात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ बळींमध्ये शुभम द्विवेदी यांचा समावेश होता. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून हल्ल्यामुळे देश हादरला आहे.

भाईचारा हवाय, मग बोलवा त्या काश्मिरी पंडितांना! | Mahesh Vichare | Pahalgam | Kashmir | Pandit |

Exit mobile version