29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणजनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

Google News Follow

Related

एकीकडे वेगवेगळ्या योजनांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट असताना ठाकरे सरकारकडे मंत्र्यांच्या नव्या घरांसाठी मात्र बक्कळ पैसे आहेत. मलबार हिल, बी. जी. खेर मार्ग येथे सरकारी जमिनीवरील ‘पुरातन’ बंगल्याच्या ठिकाणी १८ मजली निवासी टॉवर उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या बांधकामासाठी ९० कोटींची रक्कम नमूद करण्यात आली असून निविदा सादर करण्यासाठी २६ जुलैपर्यंत वेळ देण्यात आली आहे. २८ जुलैला या निविदा उघडण्यात येतील. वर्तमानपत्रात या निविदेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही जाहिरात देण्यात आली आहे.

ही जमिन जवळपास २५८४ चौरस मीटर इतकी असून तिथे हा १०५ वर्षांपासूनचा बंगला आहे. हा पुरातन नावाचा बंगला बऱ्याच वर्षांपासून पडून आहे. तिथे कुणीही राहात नाही. शिवाय, या बंगल्याची अवस्थाही बिकट आहे. तो पाडून तिथे हा निवासी टॉवर उभारला जाईल. त्यात १८ मंत्र्यांसाठी निवास बांधले जाणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकूण १०३३७.८० चौरस मीटर इतक्या जागेवर हे बांधकाम उभारले जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक मजल्यावर ५७४ चौरस मीटर इतकी जागा मिळणार असून त्यात चार दर्शनी खोल्या, स्वयंपाकघर, चार शयनगृह, कार्यालय, अभ्यागतांची जागा, अँटी चेंबर, कर्मचाऱ्यांच्या दोन खोल्या, सामान ठेवण्याची जागा अशी व्यवस्था असेल, असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख

वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

प्रत्येक मंत्र्यांचे मुंबईत स्वतंत्र बंगले असताना आणि खासगी घरेही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत असताना आणखी या घरांची भर घालून जनसामान्यांचा पैसा का उधळला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

नवी दिल्लीत होत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या माध्यमातून संसदभवन, पंतप्रधानांचे निवासस्थान नव्याने बांधले जात असताना त्यावर तोंडसुख घेणारे महाविकास आघाडीतील मंत्री, नेते आता स्वतःसाठी मात्र नव्या घरांची तजवीज करत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा