लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

राज्यात हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिले आहे. जर बेकायदेशीर भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसेने घेतली असल्याने भोंगे आणि हनुमान चालीसा यातील वाद वाढत चालला आहे. त्यामुळे गृहविभागाने आज, १८ एप्रिल रोजी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात भोंगे आणि लाऊडस्पिकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात आता राज्य सरकार नव्या गाईडलाईन्स आणण्याच्या तयारीत आहे. याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच या गाईडलाईन्स कधी जाहीर होतील याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

याबद्दल गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे या गाईडलाईन्स तयार करणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात या गाईडलाईन्स जाहीर होणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले आहेत. तसेच राज्याची शांतता भंग करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा गंभीर इशाराही यावेळी वळसे पाटील यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत

नवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

पवारांचा तो व्हिडीओ व्हायरल; भातखळकरांनी दिली टिचकी

महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला झोडपले

गृहविभागाच्या या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी स्वागत केले आहे. कंबोज म्हणाले, गृहविभागाच्या या निर्णयावर मी कुश असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. गृहविभागाने बेकायदेशीर भोंग्याला परवानगी देऊ नये तसेच यापुढे लाऊडस्पीकरसाठी गृहविभागाची परवानगी बंधनकारक असावी, असे कंबोज म्हणाले आहेत.

Exit mobile version