किती मासे गळाला लागले त्याची होणार आता अशी मोजदाद

किती मासे गळाला लागले त्याची होणार आता अशी मोजदाद

मासेमारीसाठी आजपर्यंत अनेक पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला जात होता. आता मात्र एका अद्यावत तंत्रज्ञ दिमतीस येणार असल्यामुळे मच्छीमार चांगलेच सुखावले आहेत.

भारतामध्ये आता उपग्रह नॅरबँड आयओटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या स्कायलो टेक्नॉलॉजीजने आपला “फिश कॅच रिपोर्ट” लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता मच्छिमारांचे काम खूपच सोपे आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाळ्यामध्ये किती मासे पकडले गेले हे मोजणे आता सहजशक्य होणार आहे. तसेच समुद्रात आतमध्ये खोलवर गेल्यावर या तंत्रज्ञानाचा वापर करून मच्छीमारांचे काम खूपच सोपे होणार आहे.

अद्यावत अशा या तंत्रज्ञानामुळे मासेमारी केल्यानंतर मासळी मोजणे हा खटाटोप आता खूपच कमी होणार आहे. तसेच याअंतर्गत मच्छिमार आणि बोट मालकांना रिअल-टाइम डेटा, संदेश आणि संकटकाळात एसओएस संदेश पाठविण्याची सोयही असणार आहे.

हे ही वाचा:

गाडीत पिस्तुल ठेऊन करूणा मुंडे यांना अडकवण्याचा प्रयत्न?

‘लाटा असे पापड’ ते ‘कासा ला बाहेर पडता!’ काय आहे हे वाचा…

सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती

तरुणीच्या हातून मोबाईल हिसकावून तो पळाला खरा, पण…

हे तंत्र पूर्णतः स्वदेशी असल्याकारणाने, बीएसएनएलच्या उपग्रह-जमीन पायाभूत सुविधांशी हे जोडले जाणार आहे. तसेच संपूर्ण देशभरात याची व्याप्ती असणार आहे. काश्मीर ते लडाख, कन्याकुमारी ते गुजरात आणि ईशान्य सीमेपर्यंत याचा वापर करता येईल.मच्छिमार खोल समुद्रात असताना त्यांच्याकडे किती मासळीचा साठा जमा झालेला आहे. हे आता सहजशक्य होणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता मच्छिमाराने पकडलेले मासे किती आहेत हे बंदरावर बसलेल्या व्यापारी वर्गाला समजणार आहे.

यामागील मुख्य हेतू हा मच्छीमारांचा व्यवसाय हा उत्तम पद्धतीने वाढावा हाच आहे. तसेच मासे किती वेळात बंदरावर पोहोचतील याची माहितीही या माध्यमातून आता मिळणार आहे. त्यामुळेच अनेक ग्राहक आता ताजे मासे खरेदी करू शकणार आहेत.

Exit mobile version