‘याआधी झुंडशाही राज्यात कधी पहिली नव्हती’

‘याआधी झुंडशाही राज्यात कधी पहिली नव्हती’

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणी गोष्ट घडली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले, किरीट सौमय्या यांनी पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली होती. तरीही पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांवर दबाव आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो मग सामान्य लोकांना कसे सुरक्षित वाटेल, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही. पोलीस आपले कर्तव्य विसरून दबावाखाली काम करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

याआधी राज्यात कधी अशी झुंडशाही पहिली नाही. राणा दाम्पत्य फक्त हनुमान चालीसा पठण करण्यास मुंबईत आले होते. त्या एकट्या महिलेला शिवसेना घाबरली आणि एवढे शिवसैनिक त्यांनी जमवले. हनुमान चालीसा पठण करण्यात काय गैर आहे? असेही फडणवीसांनी विचारले आहे. हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात बोलणार का? असाही टोला त्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल

‘माझा दुसरा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न’

किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला चुकीचा

मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?

भाजपा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत नाही तर सर्वसामान्य माणसाला असे वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटची राज्यात मागणी केली. मात्र सामान्य माणसालाही आताची परिस्थिती बघून हेच वाटत आहे आणि आम्ही सामान्य माणसासाठी संघर्ष करण्यास तयार आहोत. तसेच राष्ट्रपती राजवटचे काम राज्यपाल करतात त्यामुळे राज्यपाल काय करतील तसे होईल, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Exit mobile version