नेपाळी चीन्यांवर संतापले…’चायना गो बॅक’ च्या घोषणा!!

नेपाळी चीन्यांवर संतापले…’चायना गो बॅक’ च्या घोषणा!!

नेपाळच्या अंतर्गत बाबींत चीनने नाक खुपसू नये यासाठी नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले. २८ डिसेंबरला चीन सरकारचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये आले असताना नेपाळी नागरिकांनी ‘बॅक ऑफ चायना’ लिहिलेले फलक झळकावले. सोबतच चीनविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

 

चीनी सरकारचे ४ सदस्यीय शिष्टमंडळ गुओ येझोऊ यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये दाखल झाले. येझोऊ हे चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री आहेत. नेपाळमधील राजकीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा चार दिवसीय दौरा आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी नेपाळची संसद बरखास्त करून २०२१ च्या एप्रिल-मे महिन्यात मुदतपूर्व निवडणूका घ्याव्या असा प्रस्ताव दिला आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षात पंतप्रधान के.पी.शर्मा.ओली आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल असे दोन गट पडले आहेत.

 

गुओ येझोऊ हे नेपाळी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन्ही नेत्यांना भेटणार आहेत. या नाजूक परिस्थितून तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ही नेपाळची देशांतर्गत बाब आहे तर त्यात चीनने उगाच हस्तक्षेप करू नये अशी नेपाळी जनतेची भावना आहे.

 

 

 

Exit mobile version