पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी २९ जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नवे शैक्षणिक धोरण लागू केल्यापासून काय बदल झाले? ते सांगितले. भारतीय युवकांना देश त्यांच्यासोबत असल्याचं वाटलं, असं मोदी म्हणाले. तर, इंजिनिअरिंग अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये सुरु करण्यात आल्याचंही ते म्हणाले.
भारतीय साइन लैंग्वेज को पहली बार एक भाषा विषय यानि एक Subject का दर्जा प्रदान किया गया है।
अब छात्र इसे एक भाषा के तौर पर भी पढ़ पाएंगे।
इससे भारतीय साइन लैंग्वेज को बहुत बढ़ावा मिलेगा, हमारे दिव्यांग साथियों को बहुत मदद मिलेगी: PM @narendramodi #TransformingEducation
— PMO India (@PMOIndia) July 29, 2021
प्रत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखं
काय आहे राकेश झुनझुनवाला आणि अकासा एरलाईन्स कनेक्शन?
पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा
‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार
८ राज्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ११ प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. याचा देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल.