‘नेहरूंच्या शांतिदूत प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला’

‘नेहरूंच्या शांतिदूत प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला’

‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या शांतीदूत प्रतिमीमुळे भारत कमकुवत झाला, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने राजभवन येथे बोलत होते.

कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य’ कारगिल संघर्ष’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते.

‘अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. त्यांच्या शांतीदूत प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू राहिलं’.

हे ही वाचा:
काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी

‘अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशात अणुचाचणी झाली. खरंतर हे तंत्रज्ञान आपल्याकडे २० वर्षांपासून  होतं. पण आधीच्या सरकारने अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणीमुळे भारतावर निर्बंध आले, पण वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आपली कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली’ असंही कोश्यारी म्हणाले.

‘भारताला शांती हवी आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत, असंही राज्यपालांनी सांगितलं.

Exit mobile version