“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साधला निशाणा

“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”

विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर टीका करत त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असा दावा केला आहे. नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत,” असा दावा करत नीलम गोऱ्हे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला होता. यावरून नीलम गोऱ्हे यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. “नाना पटोले हे विनोदाचा भाग आहेत. त्यांच्या शब्दाला विनोदा पलिकडे काहीही अर्थ नाही. महिलांना मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांना ते बघवत नाही का?” असा संतप्त सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

चिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

राज्यात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, घडलेल्या घटना वाईट आहेत मात्र महिला धाडसाने पुढे येऊन गुन्हा नोंदवतायत हे महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version