राष्ट्रवादीचे दोन दिवसीय मंथन शिबीर पार पडले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी विधानं केली आहेत. तर नाना पटोले यांनी शिवसेना आपला नैसर्गिक मित्रपक्ष नाही, अशी कबुलीचं दिली होती. त्यातच शिबिराला एक दिवस अजित पवार हे उपस्थित नव्हते, त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत असल्याचीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केले आहे. अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
रविवारी नीलम गोऱ्हे पुणे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवारांबद्दल हे विधान केले आहे. मी डोळ्यांनी पाहिलं आहे मी आरोप करत नाही आहे असं म्हणतं गोऱ्हे म्हणाल्या, यापूर्वी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री असताना, ते विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने बोलावून निधी द्यायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली असून अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं विधान नीलम गोऱ्हेंनी केलं आहे.
हे ही वाचा:
‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती
नीलम गोऱ्हे यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज झाल्याचे म्हटले जातं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा महविकास आघाडीमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.