अतुल भातखळकर यांनी केली मागणी
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली, हे सत्य आहे. ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे, असा घणाघात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कुणाचा आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा सूचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
विधिमंडळात सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. भाजपा आमदारांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलू दिले जात नसल्याची तक्रार करत जबरदस्त घोषणाबाजी केली. नंतर विधानसभा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा आमदार तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये चर्चेसाठी गेले होते. तिथे शिवसेनेचेही आमदार आले. तिथे बाचाबाची झाली. पण तिथे भाजपा आमदारांकडून शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यातूनच हे निलंबन झाले.
हे ही वाचा:
अधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून काँग्रेस हटवणार?
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं
भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही
या निलंबनानंतर बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या एखाद्या घटनेबद्दल आमदारांचे निलंबन होऊ शकते. पण विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेसाठी जबाबदार धरून असे निलंबन कसे काय केले जाऊ शकते? तसे असेल तर मग तुरुंगात जाऊन आलेल्या छगन भुजबळांविरुद्धही कारवाई करावी लागेल.
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे.
शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.#MahaNapasAghadi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2021