२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’

२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’

जगभर उसळलेल्या कोविड महामारीच्या लाटेचा फटका हा भारतालाही बसला. अशा परिस्थितीत देशातील अनेक भागात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतला. पण याची झळ देशातील गरीब जनतेला पोहोचू नये याची पूर्ण खबरदारी ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारतर्फे घेण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा (पीएमजीकेवाय) लाभ हा भारतातील नागरिकांना मिळावा यासाठी या योजनेची कालमर्यादा वाढवली गेली.

महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेलाही या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा (पीएमजीकेवाय) खूप चांगल्या प्रकारे लाभ झाला. मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये राज्यातील तब्बल ७ कोटी नागरिकांना या योजनेतून मोफत अन्न मिळाले. या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एकट्या महाराष्ट्रासाठी ७ लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले होते. पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आघाडीवर असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

सरकारने या योजनेला आणखी पाच महिन्यासाठी मुदतवाढ दिली आहे आणि आगामी काळात उद्भवणारी ही गरज भागवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची साठवणूक केली आहे. महामंडळाकडे आधीपासूनच ११.०२ लाख मॅट्रिक टन गहू आणि ६.६५ लाख मॅट्रिक टन तांदूळाचा साठा आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व महसूल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्याचा अखंडित पुरवठा करता यावा यासाठी २ लाख मॅट्रिक टन गहू आणि १.५ लाख मॅट्रिक टन तांदूळाची भर घालण्यात आली आहे.

Exit mobile version