…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी

…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याचे ट्विट एनडीटीव्ही या वाहिनीने केले खरे, पण तातडीने ते रद्द करत ‘धाडसी पत्रकारितेचा’ एक नवा मापदंड तयार केला. का घडले असेल असे?

दोन दिवसांपूर्वी एनडीटीव्हीने ट्विट करत देशभरात ४४ हजार ६४३ रुग्णांची भर पडल्याचे म्हटले होते. कालच्या तुलनेत ही वाढ ४ टक्के आहे, असेही त्यात नमूद केले होते. पण त्यावर इस्लामी कट्टरतावादी सर्जिल उस्मानीने ट्विट करत एनडीटीव्हीला आव्हान दिल्यानंतर लगेच हे ट्विट एनडीटीव्हीने मागे घेतले. त्याचे कारण होते ते म्हणजे या ट्विटमध्ये एनडीटीव्हीने एका मुस्लिम व्यक्तीची कोरोना चाचणी होत असल्याचे छायाचित्र या ट्विटसोबत जोडले होते. त्यावर सर्जिल उस्मानीने म्हटले होते की, एनडीटीव्हीमध्ये असे कोण आहे ज्याने हा फोटो वापरला आहे? त्याचे नाव जाहीर करावे.

त्यावर एनडीटीव्हीने आपण अडचणीत येऊ असे वाटल्याने लगेच ट्विट मागे घेत ते रद्दच केले.

हे ही वाचा:

लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार

जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी

कळवा येथे घरांवर कोसळली दरड

कुर्ल्यात अडकले रेल्वे ट्रॅक…वाचा

‘करेज ऑफ जर्नालिझम’ असे बोधवाक्य मिरविणाऱ्या एनडीटीव्हीने ही माघार घेतल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या जोरदार टीका होऊ लागली आहे. मुस्लिम व्यक्तीचा फोटो वापरल्यामुळे जर आक्षेप घेतला जात असेल तर ‘करेज ऑफ जर्नालिझम’चा डांगोरा पिटण्याची काय गरज आहे, असा सवाल नेटकरी विचारत होते.

हा सर्जिल उस्मानी तोच ज्याने महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्म हा सडला आहे, अशी टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पण त्याच्याविरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.

Exit mobile version