उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

‘इंडिया’चे हाल

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ८० जागा या उत्तर प्रदेश राज्यात आहेत. येथे सन २०१४नंतर भाजपने दमदार कामगिरी केली आहे. आता नुकत्याच जाहीर झालेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला भरपूर जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

न्यूज १८च्या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशात एनडीएला ८०पैकी ७७ जागा मिळू शकतात. दोन जागा इंडिया अलायन्स आणि एक जागा बसपच्या खात्यात जाऊ शकते. एनडीएला उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या ‘इंडिया’ला २६ टक्के, मायावतीच्या बसपाला ९ टक्के आणि आठ टक्के मते अन्य पक्षांना मिळू शकतात. उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये एकूण ३० जागा आहेत. त्यापैकी एनडीएला २९, ‘इंडिया’ला एक जागा मिळू शकते. रुलेलखंडमधील सर्व १० जागा एनडीए जिंकू शकते. तसेच, पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व नऊ जागा एनडीएला मिळू शकतात. तर, अवध भागातील १३पैकी ११ जागा एनडीएच्या खात्यात जाऊ शकतात.

हे ही वाचा:

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!

अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!

“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”

देशभरातील ५१८ लोकसभा जागा आणि २१ राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात एक लाख १८ हजार ६१६ जणांची मते विचारण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि आरएलडीची आघाडी होती. त्यात भाजपला ६२ जागा मिळाल्या होत्या. तर, बसपाला १०, समाजवादी पक्षाला पाच जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला रायबरेलीची अवघी एक जागा मिळू शकली होती.

Exit mobile version