भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. ४०० पार ही केवळ घोषणा नसून आता वास्तव बनत असल्याचे मोदी म्हणाले.
निर्णायक आणि सकारात्मक मतदानासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण, तरुणींचे त्यांनी कौतुक केले. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांसाठी आज मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, लोक एनडीएसारखे मजबूत सरकार निवडण्यासाठी वचनबद्ध आहेत. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उष्णतेची लाट असूनही ते बाहेर पडले आणि मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्द्द्ल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
एनडीए ४०० जागा जिंकणार नाही या विरोधकांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना, मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आणि सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून आल्या आणि राहुल गांधी अमेठीतून निवडणूक न लढवल्याचा दाखला दिला. त्यांचा सर्वात मोठा नेता राज्यसभेवर गेला. ते (राहुल गांधी) जर त्यांनी दुसरी जागा (रायबरेली) लढवली तर ते वायनाडमधून पळून जातील. अमेठीत लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही. मी आतापर्यंत जे काही बोललो ते पूर्ण झाले आहे. त्यांना लोकांची सेवा करण्यात स्वारस्य नाही. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबात रस आहे आणि ते देशाचा विचार करत नाहीत, असेही मोदी म्हणाले.
हेही वाचा..
विश्वंभर चौधरींची मतदान करण्याची संधी हुकली; मविआचे एक मत गेले
जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
सुरक्षा दलाकडून गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त
गेल्या १० वर्षात पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्याच्या विरोधकांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधक चहाविक्रेत्या मुलाला पंतप्रधान म्हणून पाहू शकत नाही. त्यांना भीती आहे की मी तिसऱ्यांदा जिंकलो तर त्यांच्या विक्रमाला ग्रहण लागेल.
महागाईवरून विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात देशाने सर्वाधिक महागाई दर पाहिला आहे. ते म्हणाले, लाल किल्ल्यावरून त्यांच्या संबोधनात जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांनी आमच्या महागाई दराची उत्तर कोरियाच्या दराशी तुलना केली होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील युद्धामुळे चलनवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, त्यावेळी जागतिकीकरण नव्हते आणि युद्धाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. ते सबबी सांगत होते. आज महागाई नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज १.५-२.५ लाख स्टार्टअप्स आहेत आणि त्यापैकी बहुतेक टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये आहेत आणि लाखांना रोजगार देण्यात आला आहे. एक स्टार्टअप सुरू केल्याने सरासरी चार ते पाच जणांना रोजगार मिळतो. मुद्रा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जवळपास २८ लाख कोटी वितरित करण्यात आले आहेत. आम्ही आता तीन कोटी लखपती दीदी बनविण्याची योजना आखत आहोत. आम्ही चार कोटी घरे बांधली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आज दुप्पट महामार्ग आणि रेल्वे मार्ग बांधले गेले आहेत. विरोधक खोटेपणा पसरवत आहेत. खरे तर ‘तुम्ही राजकीयदृष्ट्या बेरोजगार का झाला आहात’ असा प्रश्न त्यांना विचारायला हवा. बेरोजगारी आहे हे जगाला का सांगायचे, असा टोला त्यांनी विरोधकांवर लगावला.
ते पुढे म्हणाले, एलईडी बल्बच्या क्रांतीमुळे आज वीज बिलातील सरासरी एकूण रक्कम कमी झाली आहे. पाच लाख लोकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. ८० कोटी लोकांना मोफत रेशन मिळाले आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस सरकारांवर त्यांच्या कार्यकाळात सशस्त्र दल कमकुवत केल्याचा आरोप केला. काँग्रेसमधील त्या लोकांचे मन बघा. त्यांनी आमचे माजी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना ‘गली का गुंडा’ असे संबोधले होते. १९६२ च्या युद्धानंतरची परिस्थिती आणि नेहरूंची अक्षमता त्यांना आजही अस्वस्थ करते. अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठेला’ विरोध केल्याबद्दल काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आपल्या व्होट बँकेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून राम मंदिराबाबत काँग्रेसचे मत स्पष्ट होते. त्यांना राम लल्लाला तंबूत परत पाठवायचे होते. व्होट बँकेच्या राजकारणासाठी ते या सर्व गोष्टी करू शकतात याचे मला आश्चर्य वाटते.
‘भाजप संविधान बदलणार नाही’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपने संविधानाचा अनादर केला नाही आणि काँग्रेसने संविधानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. एनडीएने ४०० जागा जिंकल्यास पक्ष राज्यघटनेत बदल करेल हा विरोधकांचा आरोप त्यांनी नाकारला. आम्ही २०१९ मध्येच ४०० हून अधिक जागा जिंकल्या. संविधान बदलण्याचा आरोप चुकीचा आहे. काँग्रेसने संविधानाचा विश्वासघात केला. आधी नेहरूंनी भाषण स्वातंत्र्य कमी केले, मग इंदिराजींनी आणीबाणी आणली. राजीव गांधीजींनी मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक आणले आणि त्याविरोधात निदर्शने झाली, हे विसरून चालणार नाही. त्यानंतर, ‘शहजादे’ म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून त्यांनी पत्रकार परिषद बोलावून अध्यादेश फाडला. त्यांनी केवळ कागदच फाडला नाही, तर संविधानाची खिल्ली उडवली.
‘कोटा आधारित आरक्षणासाठी भाजप वचनबद्ध’
पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप धर्माच्या आधारावर नव्हे तर एससी, एसटी आणि ओबीसींसाठी कोटा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही धर्मावर आधारित आरक्षण कधीही होऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने एससी, एसटी आणि ओबीसींसाठी कोटा दिला आहे आणि आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.