शेतकरी मोर्चाचे नेतृत्व करणारे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. योगेंद्र यादव यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाने केली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने यासंबंधीचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
२६ जानेवारी रोजी योगेंद्र यादव,राकेश टिकैत आणि इतर काही नेत्यांच्या नेतृत्वात दिल्लीत होत असलेल्या ट्रॅक्टर परेडने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले, लाल किल्ल्यात घुसून तोडफोड केली आणि लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वज काढून खालिस्तानी झेंडा फडकवला. हा सगळा हिंसेचा नंगानाच सुरु असताना लाल किल्ल्यात २०० पेक्षा जास्त लहान मुले अडकली होती. ही मुले प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली होती. या पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव आणि इतर शेतकरी नेत्यांवर ज्युव्हेनाईल जस्टीस कायद्या अंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.
#BREAKING NCPCR @NCPCR_ @KanoongoPriyank directed @DelhiPolice to register FIR against @_YogendraYadav n others under JJ Act for torturing 250 kids in #RedFort.
One more FIR against Yogendra Yadav inevitable #KisanTractorRally #KisanParade pic.twitter.com/Gizv2cNA95— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) January 27, 2021
‘लिगल राईट्स ऑबजर्वेटरी’ या सामाजिक संस्थेच्या ट्विटर हँडलवर या संबधीची माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी २०२१ रोजी घडलेल्या प्रकारासंदर्भात अनेक आंदोलनकर्त्यांवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने राकेश तिकैट, योगेंद्र यादव, दर्शन पाल, राजिंदर सिंग, बुटा सिंग बूर्जगील आणि जोगिंदर सिंग उग्रहान या नेत्यांची नावे समाविष्ट आहेत.
हे ही वाचा: शेतकरी आंदोलनात दुफळी
अमित शहांनी बडगा उगारला, यादव, टीकैतसह अनेकांवर एफआयआर