बदल्यांचे रॅकेट चालवणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटीलच आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड

बदल्यांचे रॅकेट चालवणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटीलच आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुनील पाटील हा आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत हा बॉम्ब फोडला आहे. मुंबई येथील क्रूज ड्रग्स प्रकरणाचे सर्व प्लॅनींग सुनील पाटील याचेच असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

सुनील पाटील हे मूळचे धुळ्याचे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी स्थापानेपासून ते जोडले आहेत. सुनील पाटील यांचे राज्यातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी घरोब्याचे संबंध आहेत. ते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असून त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जवळचे मित्र आहेत. सुनील पाटील हे राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालवतात. पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतात असा आरोप कंबोज यांनी केला आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सॅम डिसोजाचे नाव अनेकांनी घेतले. नवाब मलिक, संजय राऊत यांनी नाव घेतले, प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रातही त्याचे नाव आहे. त्या सॅम डिसोजाला १ ऑक्टोबरला या सुनील पाटील यांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मेसेज केला. मुंबई येथे क्रूज ड्रग्स पार्टी होणार आहे. या संबंधित २७ जणांची माहिती माझ्याकडे आहे. तेव्हा मला एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी जोडून दे असे सांगितले. यावेळी आपल्या बाजूने किरण गोसावी एनसीबीशी बोलेल असे सुनील पाटील याने सांगितले. तेव्हा सॅम डिसोजाला असे सांगण्यात आले की किरण गोसावी या पार्टीची सर्व माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना देईल. त्याला त्यांच्याशी जोडण्यात यावे. या वेळी डिसोजा याने एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही.सिंग यांच्याशी संपर्क साधला.

हे ही वाचा:

आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे

पालघरमध्ये पोलिसाचेच Hit And Run

भंगारवाला करोडपती कसा झाला?

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

त्यामुळे ड्रग्स केस प्रकरणाचे संपूर्ण प्लॅनिंग, प्लॉटींग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामार्फत करण्यात आल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत कंबोज यांनी सॅम डिसोजा याचा एक व्हिडिओ देखील दाखवला. ज्यामध्ये सॅम डिसोजा असे सांगत आहे की कशाप्रकारे सुनील पाटीलशी बोलल्यानंतर त्याने किरण गोसावी याची व्ही.व्ही.सिंग यांच्याशी भेट घडवून आणली. तेव्हा हे महाराष्ट्रातले कोणते मंत्री आहेत ज्यांच्या सांगण्यावरून सुनील पाटीलने हे केले? तर कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.

Exit mobile version