26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाराष्ट्रवादीचा कार्यकर्ता पीडितेच्या मदतीला गेल्याने आव्हाड संतापले

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पीडितेच्या मदतीला गेल्याने आव्हाड संतापले

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एक कथित ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. बलात्कार पीडितेसह मल्लिकार्जुन पुजारी यांनी शुक्रवारी घेतली राज्यपालांची भेट घेतली. राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता पीडितेच्या मदतीला गेल्याने आव्हाड संतापले.

महिला अत्याचाराचा आरोप असणारा एक इसम थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मदत मागायला जातो असा उल्लेख या ऑडियो क्लिप मध्ये करण्यात आला आहे. तर आरोप करणारी मुलगी ‘मरू दे’ अशा प्रकारचे संभाषण या क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली असून ‘साहेबांच्या’ महिला धोरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मल्लीकार्जुन पुजारी नावाच्या व्यक्तीला एका साहेबांच्या कार्यालयातून फोन जातो. नंतर स्वतः साहेब फोनवर बोलू लागतात. या साहेबांचा आवाज मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांमधील संभाषण पुढील प्रमाणे आहे.

हे ही वाचा:

गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशात पुन्हा उमलणार कमळ, काँग्रेस गमावणार पंजाबची सत्ता

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण

अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

साहेब:- ए मल्लीकार्जुन तु कुठल्या तरी माणसाला ब्लॅकमेल करतोयस एका पोरीवरून

मल्लीकार्जुन:- तुमच्याकडे आले का ते?

साहेब:- अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल पटेलकडे गेले

मल्लीकार्जुन:- साहेब ब्लॅकमेल करत नाही. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली होती

साहेब:- भो** गेली ती…काहीतरी करतो नको ते उद्योग

मल्लीकार्जुन:- मी काय केलं साहेब? मी थोडी त्याला ब्लॅकमेल केलं?

साहेब:- अरे टी सिरिजचा मालक आहे तो समोरचा माणूस

मल्लीकार्जुन:- अहो साहेब मला माहित्ये..ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती.

साहेब:- अरे जाऊ दे मरू दे तिला. तू फुकट कशाला बदनाम होतोय त्यामध्ये?

मल्लीकार्जुन:- मी काय बोललो का साहेब? तोच मला बोलला, त्या मुलीला गुन्हा दाखल करू देऊ नका. मी म्हटलं मी काय समजावणार. तुझं काय असेल तर तू येऊन भेटून घे ना नवी मुंबईमध्ये

साहेब:- तू त्यांच्या मधे पडू नको. त्याला सांग तुझे तू बघ.

मल्लीकार्जुन:- ठीक आहे साहेब.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा