पुणे येथील लोणी काळभोर भागातील एका महिला सरपंचांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारा इसम हा राज्याचे गृह खाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. मारहाणीच्या या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गौरी गायकवाड असे मारहाण करण्यात आलेल्या महिला सरपंचांचे नाव आहे. त्या लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी गायकवाड यांच्या मारहाणीची घटना समोर आली आहे. लसीकरणाच्या श्रेयवादावरून हा सारा प्रकार घडल्याचे समजते. सुजित काळभोर असे मारहाण करणार्या इसमाचे नाव समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चेत
थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना ‘बेस्ट’ बसेसचा ठेंगा
या प्रकरणात गौरी गायकवाड यांच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सुजित काळभोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुजित काळभोर याने देखील गौरी गायकवाड यांची तक्रार केली असून त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. तर गायकवाड यांच्या सोबतच अविनाश बडदे, सचिन काळभोर आणि महेश काळभोर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवार, 3 सप्टेंबर रोजी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल हायस्कूल येथे आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सरपंच या नात्याने गौरी गायकवाड उपस्थित होत्या. त्यावेळी सुजित काळभोर तेथे आला अविनाश बडदे आणि सुजित काळभोर यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. सरपंच या नात्याने गौरी गायकवाड हा वाद मिटविण्यासाठी गेल्या असता याच वेळी सुजित काळभोर याने गौरी गायकवाड यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली.
भाजपा नेत्या चित्रा वाघ या प्रकरणात आक्रमक झाल्या असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांना अशाप्रकारे वागण्याचे लायसन्स दिले आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे !
पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच @GauriCGaikwad यांना मारहाण झालीय !
मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…..(१/२)@PuneCityPolice @CPPuneCity @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/IKZs4Bakts
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 3, 2021