महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही वर्षात केलेल्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार हे आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. पण याच पक्षाच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारणाला प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग येथील भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले.
शिवरायांचं नाव घेतलं तर मुस्लिम मते गमवावी लागतात त्यामुळे फंडिंग गोळा करण्यासाठी कुठल्या तरी टोळ्या उभ्या करायच्या हे राजकारण आहे. राष्ट्रवादीने १९९९पासून हे विष महाराष्ट्राच्या राजकारणात घातलं, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, जातीच्या राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो. लोकांना आधी इतिहास माहीत नव्हता का किंवा आताच लोक जागृत झाले का?
हे ही वाचा:
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु
उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?
साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार
राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर
राज ठाकरे यांनी सांगितले की, शरद पवारांनी आजवर व्यासपीठावर शिवरायांचे नाव घेतले नाही. त्यांचे नाव घेतले तर मुस्लिम मते जातील अशी भीती त्यांना वाटते. शरद पवार नेहमी शाहू फुले आंबेडकर यांचा उल्लेख करतात. मुस्लिम मते जाऊ नयेत म्हणून काही टोळ्या उभ्या करून त्यांच्याकडून ते शिवाजी महाराजांचे राजकारण करून घेतात. त्यामुळे मराठी समाज आणि इतरांमध्ये फूट पडेल. मागे मुलाखतीत मी त्यांना सवाल केला होता की, तेव्हा ते म्हणाले होते की, शाहू फुले आंबेडकर हा एक विचार आहे. तेव्हा मी विचारले मग शिवाजी महाराज हा विचार नव्हता का?
शिवाजी महाराजांच्या अपमानावरून सध्या राजकारण पेटलेले असताना त्यावर राज ठाकरे म्हणाले की, आजकाल कुणीही उठतो आणि काहीही बोलतो. याचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. आज अचानकच सगळ्यांना इतिहास कळायला लागला आहे का?