दूध मांगोगे तो दूध देंगे, इन्व्हेस्टमेंट मांगोगे तो यूपी गुजरात को देंगे असा एक फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारला टोमणे मारले आहेत. सत्ता गेल्यामुळे आता असे फोटो एडिट करून टाकण्याची वेळ विरोधी पक्षांवर आली की काय, असा सवाल जनसामान्यांकडून विचारला जात आहे.
जयंत पाटील यांनी झोमॅटो आणि ब्लिन्किट यांच्या जाहिरातींच्या दरम्यान शिंदे फडणवीस यांचे फोटो असलेली एक जाहिरात टाकली आहे. त्यावर शब्द मात्र एडिट केलेले आहेत. त्यात इन्व्हेस्टमेंट मांगोगे तो यूपी गुजरात को देंगे असे शब्द इंग्रजी अक्षरांमध्ये लिहिले आहेत. त्यावरून आता जयंत पाटील यांच्यावर टीका होत आहे. फोटोतील प्रतिमा आणि वास्तव यांचा संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
बॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे
हिजाब विरोधात निषेध करणाऱ्या दोन तरुणांना फाशी
स्वैराचाराविरोधात माझा लढा सुरूच राहणार!
आम्हाला आमची जमीन माहिती आहे, जे हवेत आहेत त्यांची तपासणी करायला हवी
सत्ता गेल्यामुळे आता फावल्या वेळेत जयंत पाटील यांना नवा उद्योग सापडला आहे की, काय, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सध्या महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते हे खालच्या भाषेत, टोमण्यांच्या भाषेतच टीका करत आहेत. जयंत पाटील यांनीही याच टोमण्यांचा आधार घेतला आहे.
फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! 🤫 pic.twitter.com/CxBBRMtaKn
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 9, 2023
उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत हे रोज अश्लाघ्य भाषेत बोलून सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. महापुरुषांच्या अपमानाचा मुद्दा करून त्यावरूनही सत्ताधारी पक्षांवर आरोप करण्याची एक मालिका विरोधी पक्षांनी सुरू केली आहे.