राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?

राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष पदावरून वेगळं वातावरण तयार झालेले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर  एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. यशवंराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत या राजीनामा नाट्यावर चर्चा सुरु होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चेत आहे. पण अखेर प्रफुल्ल पटेल यांनी आज बैठक घेण्यात आलेली नव्हती असे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. शरद पवार यांनीही एकूण अंदाज घेऊन अखेर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ द्या, अशी कार्यकर्त्यांची समजूत घातली. आता येत्या ५ मे रोजी अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली.

सध्या शरद पवार यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावर यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये दिवसभर मंथन आणि बैठका सुरू होत्या. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी आणि अजित पवारांकडे राज्याची जबाबदारी, असे धोरण ठरल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दिवसभर कार्यकर्त्यांचे देखील राजीनामा नाट्य सुरु होते. अखेर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. बैठक आणि इतर निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल. अफवा पसरवू नका असे आवाहन केले.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपल्याला बैठकीला बोलावले नाही. आपल्याला बैठक आहे याची माहिती नव्हती. आजच्या बैठकीला मला बोलावण्याची गरज वाटली नसेल अशी नाराजी व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात ही बैठकच घेण्यात आली नव्हती असे नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. शरद पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. आजचा दिवस जाऊ द्या असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! आणखी ‘हे’ निर्णय घेतले

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष पदावरून वेगळं वातावरण तयार झालेले आहे. शरद पवार हे देखील कितीही मनधरणी केल्यानंतर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही केलं जात आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आता ५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावण्यात आलेली आहे. ही बैठक शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची असेल. आधी निवड समितीची बैठक ६ मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी ५ मेला बोलावली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version