राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

केरळ उच्च न्यायालयाचा शिक्षेला स्थगिती देण्यास नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. फैजल आणि अन्य तिघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.

लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभेत अपात्र ठरवण्यात आले आहे. मोहम्मद फैजल यांना अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. फूट पडलेल्या राष्ट्रवादीसाठी आणि शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मोहम्मद फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आले.केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा सदस्य मोहम्मद फैजल यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांच्या दोषी ठरविण्याची तारीख, म्हणजे ११ जानेवारी २०२३ असल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा

‘आप’चे खासदार संजय सिंग यांना ईडीकडून अटक

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज

‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

मोहम्मद फैजल यांना २००९ मधील एका राजकीय खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. ही शिक्षा आधी सत्र न्यायालयाने ठोठावली होती. त्यावर केरळ उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, नंतर या प्रकरणातील पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.

Exit mobile version