नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी

शरद पवारांना पुन्हा धक्का

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी बंडखोर नेते अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागालँडमधील सातही पक्षाच्या आमदारांनी बंडखोर नेते अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चर्चा आणि विचारविनिमयानंतर नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदारांनी या पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

फिफा रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल ९९व्या क्रमांकावर

दोन प्रकारच्या सेक्स सीडी, बीभत्स आणि राजकीय

प्रवाशांना अत्यल्प दारात जेवण मिळणार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. २ जुलै रोजी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली.

 

अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली.

Exit mobile version