जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांचा देखील राजीनामा

जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउत्तर होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये मुंबईच्या वाय. बी. चव्हाण राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होत आहे.  ही बैठक होत असतानाच राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांनी निर्णय घेतांना आपल्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप करत आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्या बरोबरच ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याच्या आधी ट्विट करून शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले. आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार’.साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

सगळे कार्यकर्ते आपापले राजीनामे जयंत पाटील यांना पाठवत आहेत. मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे. मी सुद्धा  माझा राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवला असल्याचे आव्हाड यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले.  शरद पवारांना निर्णय मागे घ्यावा लागेल. ते नेहमी म्हणायचे की, लोकशाहीत लोकांचे ऐकावे लागते. लोकांच्या कलासोबत नेत्यांनी चालले पाहिजे. नेते भले नाराज झाले, तरी चालतील. मात्र, लोक ज्या बाजूने आहेत, त्यांनी त्याच बाजूने त्यांनी चालले पाहिजे. शरद पवार असे कसे करू शकतात, त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न आव्हाड यांनी राजीनामा देताना उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत

मुंबईच्या सर्वच लोकल होणार गारेगार

तुकाराम मुंढे, करीर, म्हैसकर यांच्याकडे आता ‘या’ जबाबदाऱ्या

जितेंद्र आव्हाड राजीनामा देताना म्हणाले, शरद पवारांसाठी आमचे आयुष्य काहीच नाही का? ही लढाई आम्ही शरद पवारांशिवाय कशी काय लढणार? मी आतापर्यंत जी-जी भूमिका घेतली, ती लोकांनी आणि नंतर पक्षाने घेतली. शरद पवार नेहमी नव्या लोकांना संधी देतात. आता आम्हीही राजीनामा दिला आहे. नव्या लोकांना घ्यावे, अशी प्रतिक्रियाही देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version